गुढी पाडवा व नववर्ष स्वागत शोभायात्रा
सामूहिक गुढी -
दरवर्षीप्रमाणे या हि वर्षी आपल्या मधुकोष सोसायटी मध्ये वर्ष प्रतिपदा निमित्त सामुदायिक गुढी उभारण्याचा कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता बास्केट बॉल मैदानावर अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.पालखी सोहळा व शोभायात्रा -
सायंकाळी ५:०० च्या सुमारास गुढी जवळ सर्व नागरिक पुन्हा तेव्हढ्याच उत्साहाने आले आणि गुढी उतरवल्यानंतर प्रभू श्रीरामांची पालखी निघाली जवळच असलेल्या जगदंबा माता मंदिराकडे. साधारण ६०-७० महिला, ३०-३५ पुरुष आणि ३०-४० बच्चे मंडळी यात सहभागी होते. मधुकोष चे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हे समाजाला सोबत घेऊन होतात याचेच उदाहरण म्हणून शेजारीच असलेल्या सुंदर संस्कृती कडे पालखी रवाना झाली आणि त्या सोसायटी मधील नागरिक देखील सहभागी झाले.श्रीरामाचे भजन, गायन, मंजुळ टाळ वाजवत महिला भजनी मंडळ पालखीची शोभा वाढवत होते. छोटे छोटे बच्चे मंडळी देखील हातात विजयाचे प्रतीक असलेली भगवी ध्वजा घेऊन मनसोक्त नाचत होती. वर साज चढवला उत्साही अश्या महिला व पुरुषांनी ज्यांनी पालखी समोर मनसोक्त फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
अतिशय उत्साही चैतन्यमय भरलेल्या वातावरणात पालखी जगदंबा माता मंदिरात जाऊन भजनी मंडळाने छान ४-५ भजने गाऊन साधारण ६:३० वा पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात उत्सव करण्याचे ठरवून सर्व नागरिकांनी निरोप घेतला.
बोला -
प्रभू श्री राम चंद्र कि..... जय
सियावर रामचंद्र कि ..... जय
पावनसुत हनुमान कि..... जय
भारत माता कि ...... जय
धन्यवाद...