Wednesday, June 21, 2023

आंतरराष्ट्रीय योग दिवस - २१ जून २०२३

 आंतरराष्ट्रीय योग दिवस - २१ जून २०२३

नमस्कार,

  दर वर्षी प्रमाणे या वर्षीही मधुकोष मध्ये आज दि. २१ जून २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सोसायटीमधील सौ अनुराधा आपटे यांचा योगशिक्षक म्हणून असलेला प्रदीर्घ अनुभव पाठीशी असताना कार्यक्रम रंजक, माहितीपूर्ण होणार यात काही शंकाच नसते.


मधुयोग वर्ग - थोडी माहिती 

२०१६ पासून सुरुवात. 

या मार्फत दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. 

आजपर्यंत साधारण ४५० जणांनी सहभाग नोंदविला आहे. 

वर्ग सोसायटी मध्ये  दैनंदिन होतो. 

वेळ - सकाळी ६:३० ते ७:३०

वर्ग शिक्षिका - सौ. अनुराधा आपटे 

(योगवर्ग विनामूल्य असतो.)















Saturday, August 20, 2022

स्वातंत्र्य पंच्याहत्तरी - मधुकोष 🇮🇳

स्वातंत्र्य पंच्याहत्तरी - मधुकोष 🇮🇳    

    नमस्कार, दरवर्षी प्रमाणे यंदाचा ७५ व अमृत महोत्सवी स्वातंत्र्योत्सव मधुकोष मध्ये साजरा करण्यात आला. २०२२ चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त, संकुलामधील डॉ. विजयकुमार डोंगरे, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री पराग भिडे आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या - संस्कार भारती- साहित्य विधा अखिल भारतीय  समिती सदस्य आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रसिद्धी संयोजक, पत्रकार,  माध्यम अभ्यासक डॉ नयना कासखेडीकर यांच्या हस्ते झेंडावंदन, 🇮🇳 राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

    तत्पश्चात संकुलामधील विविध कलाकारांनी गायन कौशल्य सादर केले यात ज्येष्ठ भजनीमंडळाकडून 'संस्कृत गीत' गायन करण्यात आले. सौ. गायकवाड यांचे एकल गीत, गायक कलाकारांचे ससंगीत संपूर्ण वंदेमातरम यांनी बहार आणली. 

    सांस्कृतिक वार्तापत्राच्या 'फाळणीच्या वेदना' या विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले, या प्रसंगी श्री अजय जोशी, कोषाध्यक्ष, सांस्कृतिक वार्तापत्र यांनी मनोगत व्यक्त केले. 

    संकुलामधील सामाजिक उपक्रमांची माहिती देत असताना श्री करजगी यांनी 'प्लास्टिक कचरा संकलन व विघटन त्याचप्रमाणे रद्दी संकलन, तसेच श्री क्षीरसागर यांनी 'एक मुष्ठी अमृत धान्य संकलन' योजना सविस्तर सांगितली. 

"कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ नयना ताई यांनी ''स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी'' हा अभिवाचन कार्यक्रम सादर केला. हे अभिवाचन अत्यंत भावविभोरपणे तर होतेच शिवाय  विविध कवींच्या प्रेरणादायी रचना ऐकवून तत्कालीन समाजामध्ये कवींनी घडवून आणलेल्या जागृतीचा उजाळा त्यांनी करून दिला." 

कार्यक्रमाच्या ठिकाणी 'भारतीय विचार साधना' प्रकाशन पुणे च्या विविध देशभतीपर विषयांच्या पुस्तकांचे केंद्र देखील ठेवण्यात आले होते. 

संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे पिनाक सौ. अनघा रानडे यांनी समर्थपणे पेलले. 


भारत माता पूजन 🙏🏻 व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 


भारत माता कि जय!

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

कार्यक्रमाची क्षणचित्रे



















Thursday, June 20, 2019

आंतरराष्ट्रीय योग दिवस - २१ जून २०१९

नमस्कार,
  दर वर्षी प्रमाणे या वर्षीही मधुकोष मध्ये आज दि. २१ जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सोसायटीमधील सौ अनुराधा आपटे यांचा योगशिक्षक म्हणून असलेला प्रदीर्घ अनुभव पाठीशी असताना कार्यक्रम रंजक, माहितीपूर्ण होणार यात काही शंकाच नसते.

दररोज विनासाधन करता येण्यासारखी ८ योगासने आज करण्यात आली. यात शयनस्थिती (पाठीवर झोपून) करण्यासारखी द्विपाद उत्तानासन, पवन मुक्तासन, विपरीत शयनस्थितीत (पोटावर झोपून) करण्यासारखी भुजंगासन, धनुरासन, समस्थिती (बसून) करण्यासारखी फुलपाखरू (बटरफ्लाय), पश्चिमोत्तानासन  तसेच दंड स्थितीत (उभे राहून) करण्यासारखी ताडासन, मृदूंगासन. हि ८ आसने नित्यनेमाने केल्यास अनेक व्याधींपासून मुक्तता मिळते.

योग निगडित विविध विषयांवरील बौद्धिक माहिती - त्यानंतर दरवर्षी जशी एका विषयावर बौद्धिक माहिती सांगितली जाते तशी या वर्षी "शरीर आणि मन स्वास्थ्य" या विषयावर सौ आपटेंनी माहिती सांगितली. गत ४ वर्षांपासून अश्या अनेक विषयांवर आपल्याला ऐकायला मिळते आणि योग या विषयाशी जोडून घेण्याचा आपल्याला योग येतो.  यापूर्वी योग शास्त्र म्हणजे काय, अष्टांग योग, आहार विहार व दिनचर्या ऋतुचर्या  यांवरील माहिती आपण ऐकलेली आहे.

कार्यक्रमाचा समोरप समंत्र त्रयोदश सूर्यनमस्कारांनी करण्यात आला.

चला तर मग, निरोगी शरीर आणि तसेच निरोगी मनासाठी योगासनांचा दैनिक अभ्यास आणि सराव करूया, भारताला बलशाली बनवूया. 

धन्यवाद

काही क्षणचित्रे -






Sunday, April 7, 2019

गुढी पाडवा व नववर्ष स्वागत शोभायात्रा

गुढी पाडवा व नववर्ष स्वागत शोभायात्रा 

सामूहिक गुढी  - 

   दरवर्षीप्रमाणे या हि वर्षी आपल्या मधुकोष सोसायटी मध्ये वर्ष प्रतिपदा निमित्त सामुदायिक गुढी उभारण्याचा कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता बास्केट बॉल मैदानावर अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.
सोसायटीमधील उत्साही अश्या ३ पिढ्या या उत्सवात सहभागी झाल्या. साधारण ८०-९० जणांनी मिळून गगनाला भिडणारी १५-१६ फूट उंच अशी गुढी उभी केली आणि भारत मातेचा, प्रभू श्री रामचंद्रांचा, भीमरूपी हनुमानाचा आणि सीता मैय्याचा जयजयकार करण्यात आला.

पेढे वाटून सर्वांनी पारंपरिक वेषात नवीन वर्षाचे स्वागत केले आणि संध्याकाळी होणाऱ्या प्रभू श्रीराम चंद्रांच्या पालखी सोहळ्यासाठी जमण्या चे ठरवून निरोप घेतला.

पालखी सोहळा व शोभायात्रा - 

सायंकाळी ५:०० च्या सुमारास गुढी जवळ सर्व नागरिक पुन्हा तेव्हढ्याच उत्साहाने आले आणि गुढी उतरवल्यानंतर प्रभू श्रीरामांची पालखी निघाली जवळच असलेल्या जगदंबा माता मंदिराकडे. साधारण ६०-७० महिला, ३०-३५ पुरुष आणि ३०-४० बच्चे मंडळी यात सहभागी होते.  मधुकोष चे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हे समाजाला सोबत घेऊन होतात याचेच उदाहरण म्हणून शेजारीच असलेल्या सुंदर संस्कृती कडे पालखी रवाना झाली आणि त्या सोसायटी मधील नागरिक देखील सहभागी झाले.

श्रीरामाचे भजन, गायन, मंजुळ टाळ वाजवत महिला भजनी मंडळ पालखीची शोभा वाढवत होते. छोटे छोटे बच्चे मंडळी देखील हातात विजयाचे प्रतीक असलेली भगवी ध्वजा घेऊन मनसोक्त नाचत होती. वर साज चढवला उत्साही अश्या महिला व पुरुषांनी ज्यांनी पालखी समोर मनसोक्त फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

अतिशय उत्साही चैतन्यमय भरलेल्या वातावरणात पालखी जगदंबा माता मंदिरात जाऊन भजनी मंडळाने छान ४-५ भजने गाऊन साधारण ६:३० वा पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात उत्सव करण्याचे ठरवून सर्व नागरिकांनी निरोप घेतला.








बोला -
प्रभू श्री राम चंद्र कि..... जय
सियावर रामचंद्र कि ..... जय
पावनसुत हनुमान कि.....  जय
भारत माता कि ...... जय 

धन्यवाद...
   



Saturday, January 27, 2018

मधुकोष सोसायटी में ६९ वा गणतंत्र दिन

 धुकोष सोसायटी में ६९ वा गणतंत्र दिन अत्याधिक उमंग से मनायाँ गया सोसायटी के अध्यक्ष (श्रीमान श्रीनिवास डोम्बे, श्रीमान वैभव काजळे और  श्रीमान अजित नाईक) ने ध्वजावरोहण कियाँ और अत्यंत जोश से भरे हुएँ राष्ट्रगीत के साथ समारोह का आरंभ हुआँ मधुकोषवासी सौ. गायकवाडजी  नें 'हैं प्रीत जहाँ की रित यहाँ' इस गीत को वैयक्तिक सादर कर देश कें प्रती गुणप्रटन कार्यक्रम की नींव रखी अनंतर पांच से आठ वर्ष आयु वालें बालगोकूलम् के बच्चियों नें 'चंदन हैं इस देश की माटी' प्रस्तुत कर शोभा बढा दी तत्पश्चात बाद सौ. गोखले आजी  और अन्य महिलाओं ने संस्कृत में सांघिक गीत गाकर समारोह में चार चांद लगा दिये बच्चों नें अमृतवचन तथा सुभाषित उद्धृत कियें

पुणे महानगर में स्थित एक सामाजिक कार्यकर्ता श्री. संजय अनंत कुलकर्णीजी नें भारतमाता की प्रतिमा कों पुष्पहार अर्पण कर उद्बोधन आरंभ कियाँ उन्होनें कहाँ

"देशभक्ती केवल समारोह या आपत्कालीन प्रकटीकरण का नहीं अपितू छोटी-छोटी बातों में भी नित्य अभ्यास का विषय हैं

इसके पुष्ट्यर्थ उन्होंने एयर इंडीया में करीब एक दशक की नौकरी के दरम्यान समूचे विश्व में अनेकों देशों में वहाँ के नागरिकों के इस विषय में जो अनुभव प्राप्त हुए उसकी रोचक घटनाएँ बतायी भाषण इतना प्रभावशाली था कें उस दरम्यान एक भद्र महिला स्टेज पर आयी और उन्होनें भी अपने एकाद अनुभव बतायें

भारतमाता पूजन से कार्यक्रम संपन्न हुआँ इसमें विशेष बात यहँ थी की बच्चों, युवाओं, महिलाओं, वृद्धों, सभी नें एक कतार में आकर माँ भारती को पुष्प अर्पण कीयें मधुकोष की दो बालक वहां पेढे बाँटनें के लिए खडे थें कार्यक्रम के आयोजन में सोसायटी के पदाधिकारी गणोने स्वयं उत्साह से भरपूर हिस्सा लिया



➨ कुल संख्या - १०८,  पुरूष - ४५,  महिलाएँ - ४१,  बाल - २२.



➵ कार्यक्रम सादर किया गया संस्कृत गीत You Tube पर - मधुकोष प्रजासत्ताक दिन २०१८

➳ कार्यक्रम के कुछ क्षणचित्र - मधुकोष सोसायटी में ६९ वा गणतंत्र दिन

- शब्दांकन 


श्री शैलेश खांडेकर, जे १००१







Tuesday, August 15, 2017

७१ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस.. आणि भारत माता पूजन ...

मधुकोष सोसायटीमधील "७१  वा भारतीय स्वातंत्र्य दिवस.. आणि भारत माता पूजन ..."

ज़िंदा रहने के मौसम बहुत है मगर
जान देने की रुत रोज़ आती नहीं
हुस्न और इश्क़ दोनों को रुसवा करे
वो जवानी जो खु में नहाती नहीं
आज धरती बनी है दुल्हन साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
कर चले हम फ़िदा जाने तन साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों 

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मधुकोष मध्ये भारत माता पूजन आणि झेंडावंदन साजरा करण्यात आला.
यंदाचे वर्ष हे कोयनेच्या भूकंपाचे ५० वे वर्ष तसेच आगामी वर्ष हे किल्लारीच्या भूकंपाचे २५ वे स्मरण वर्ष. आणि हेच औचित्य साधून मधुकोष मधील रहिवासी श्रीयुत श्रीपाद फाटक, MSc Physical Chemistry आणि भूकंप अनुमान प्रणालीतील अभ्यासक, संशोधक यांचे "भूकंप - माहिती, अनुमान करण्याचे तंत्रज्ञान आणि घ्यावयाची काळजी" या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले.
सोसायटीमधील वरिष्ठ रहिवाशी श्री. फाटक, श्री आपटे आणि श्री जोगळेकर या आजोबांनी ध्वजारोहण केले आणि सर्व बालकांनी व नागरिकांनी राष्ट्रगीत म्हणून भारत मातेचा जयजयकार केला. या नंतर सौ. गायकवाड यांचे अतिशय सुरेल आवाजात 'कर चले हम फ़िदा जाने तन साथियों' हे देशभक्तीपर गीत साजरे झाले आणि वातावरणात देशभक्तीने भारून गेले. हकीकत सिनेमाच्या या गीताने १९६२ च्या चीनच्या युध्दाची सर्व जेष्ठ नागरिकांना आठवण आली नाही तर कसे आणि लगेचच सध्याच्या चीन च्या मालावर बहिष्कार घालण्याचा विचार देखील नागरिकांमधून मांडण्यात आला.
श्री फाटक यांनी भूकंप विषयावरच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी, भूकंपाचे अनुमान काढण्याचे तंत्रज्ञान, जगभरात आता पर्यंत झालेले मोठे मोठे भूकंप, त्यांच्या आधी निसर्गाने दिलेले संकेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास फाटकांनी सर्वांसमोर सविस्तर पणे मांडला. निसर्गात निर्माण होणारे भूकंप आणि त्याचे संकेत देण्याची निसर्गानेच केलेली व्यवस्था, पशुपक्षी, भूजल तसेच जमिनीवरचे पाणी यांचे या काळातील वर्तन आदी माहिती देऊन पूर्वी झालेले भूकंप आणि त्याआधीचे मिळालेले संकेत त्यांनी उदाहरणादाखल सांगितले. रहिवाश्यांच्या विविध प्रश्नांचे, माहितीचे उत्तर देऊन कार्यक्रमाची सफलता झाली.

सर्व रहिवाश्यांनी भारत माता प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची क्षणचित्रे - येथे बघा











Friday, June 16, 2017

रक्तदान शिबीर - दिनांक १४ मे २०१७

 धुकोष सोसायटीचे दार वर्षी प्रमाणे या वर्षी चे देखील रक्तदान शिबीर उत्साहात दिनांक १४ मे २०१७ रोजी आयोजित करण्यात आले, त्याचा छोटेखानी वृत्तांक - 


नमस्कार,
सर्व मधुकोष रहिवाश्यांचे अभिनंदन,💐💐💐💐, आज  जनकल्याण रक्तपेढी तर्फे मधुकोष मधील रक्तदानाचे सलग तिसरे वर्ष होते.सोसायटी मधील एकूण - ३५ रहिवाशी नागरिकांनी रक्तदान केले. १४ - नागरिकांना रक्तदान हिमोग्लोबिन मुळें करता आले नाही, त्यात १० महिलांचा समावेश.

कार्यक्रम:
सर्वप्रथम सकाळी तीनही फेज चे प्रतिनिधींनी स्वरूपात डाॅ उमेश कुलकर्णी,  डाॅ डोंगरे काका, डाॅ हिमांशु डोंगरे व डाॅ श्री व सौ स्वानंद घोलप यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व भारतमाता पुजन करून रक्तदानाची सुरूवात झाली.सर्व रक्तदात्यांना रक्तदाना नंतर पुर्णम ईको व्हिजन महिला बचत गटाने तयार केलेल्या कापडी पिशव्या भेट स्वरूपात वितरीत करण्यात आल्या आणि या उपक्रमाची सर्वांनीच प्रशंसा केली, प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर कमी व्हावा हा ह्या मागचा उद्ददेश.
तसेच मधुकोष मधे काम करणारऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळ्याचे पाणपोईचे उदघाटन सर्व फेज मधील पदाधिकाऱ्यांचा हस्ते  करण्यात आले.

रक्तदान शिबीर आयोजन करण्याची अनुमती व सहभागा बद्द्ल सर्व फेज मधील पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च आभार व धन्यवाद. 

विशेष:
या रक्तदान शिबिरात मधुकोष मधील रहिवासी श्री विक्रम ईनामदार यांनी ५० वेळेस रक्तदान केले आहे व श्री सुबोध पाठक यांनी ३७ वेळेस रक्तदान केले आहे  🙏🏻

टीप: 
    ह्या वेळेस महिलांचा रक्तदानात सहभाग व प्रतिसाद चांगलांच होता. पुढील वर्षी महिला रक्तदात्या कश्या  वाढतील ह्याकडे पाहुयात. 

धन्यवाद!