नमस्कार,
दर वर्षी प्रमाणे या वर्षीही मधुकोष मध्ये आज दि. २१ जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या सोसायटीमधील सौ अनुराधा आपटे यांचा योगशिक्षक म्हणून असलेला प्रदीर्घ अनुभव पाठीशी असताना कार्यक्रम रंजक, माहितीपूर्ण होणार यात काही शंकाच नसते.
दररोज विनासाधन करता येण्यासारखी ८ योगासने आज करण्यात आली. यात शयनस्थिती (पाठीवर झोपून) करण्यासारखी द्विपाद उत्तानासन, पवन मुक्तासन, विपरीत शयनस्थितीत (पोटावर झोपून) करण्यासारखी भुजंगासन, धनुरासन, समस्थिती (बसून) करण्यासारखी फुलपाखरू (बटरफ्लाय), पश्चिमोत्तानासन तसेच दंड स्थितीत (उभे राहून) करण्यासारखी ताडासन, मृदूंगासन. हि ८ आसने नित्यनेमाने केल्यास अनेक व्याधींपासून मुक्तता मिळते.
योग निगडित विविध विषयांवरील बौद्धिक माहिती - त्यानंतर दरवर्षी जशी एका विषयावर बौद्धिक माहिती सांगितली जाते तशी या वर्षी "शरीर आणि मन स्वास्थ्य" या विषयावर सौ आपटेंनी माहिती सांगितली. गत ४ वर्षांपासून अश्या अनेक विषयांवर आपल्याला ऐकायला मिळते आणि योग या विषयाशी जोडून घेण्याचा आपल्याला योग येतो. यापूर्वी योग शास्त्र म्हणजे काय, अष्टांग योग, आहार विहार व दिनचर्या ऋतुचर्या यांवरील माहिती आपण ऐकलेली आहे.
कार्यक्रमाचा समोरप समंत्र त्रयोदश सूर्यनमस्कारांनी करण्यात आला.
धन्यवाद
काही क्षणचित्रे -

चला तर मग, निरोगी शरीर आणि तसेच निरोगी मनासाठी योगासनांचा दैनिक अभ्यास आणि सराव करूया, भारताला बलशाली बनवूया.
धन्यवाद
काही क्षणचित्रे -

No comments:
Post a Comment