तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास संस्थेत मधुकोषचा सेवा सहभाग
विद्या विवादाय धनं मदाय
खलस्य शक्तिः परिपीडनाय ।
साधोस्तुसर्वम विपरीतमेतत्
ज्ञानाय दानाय च रक्षणाय ॥
ह्या उक्तीला सार्थ करत रविवारी दिनांक १३
नोव्हेंम्बर २०१६ रोजी मधुकोष सोसायटी तसेच परिसरातील अन्य
रहिवासी सोसायटींनी वेल्हे (तोरणा किल्ला पायथा) येथील "तोरणा राजगड परिसर समाजोन्नती
न्यास" या संस्थेत सेवादानात सहभागी झाले.
न्यासाची माहिती
सन १९८६ साली अतिशय छोट्या स्वरूपात स्थापना झालेल्या
या वसतिगृहात सध्या आजूबाजूच्या सर्व दुर्गम अश्या गावांमधून
आलेले ५० मुले विद्यार्थी इथे राहून शिक्षण घेतात. आतापर्यंत १००० मुले
इथे शिकून बाहेर पडली आहेत, बरेच जण समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत आहेत जसे काही
जण सरपंच, पोलीस, मोठ्या कंपनी मध्ये नौकरी करत आहेत. गावी जाताना आवर्जून
न्यासाच्या वसतिगृहात भेट देत जिथे आपण घडलो त्या जुन्या आठवणी ताज्या
करतात तसेच जमेल तशी मदत देखील करतात, न्यासाने ठरवले आहे कि शासकीय मदतिशिवाय आपण समाजाच्या
मदतीनेच ह्या प्रकल्पाची उभारणी करावी आणि ह्याच उद्देशाला मदत म्हणून सोसायटी
ने हा उपक्रम राबवला आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व नागरिकांनी
दिला.
श्री आंबेकर हे वसतिगृहाचे पालक म्हणून १६ वर्षांपासून पूर्णवेळ काम पाहतात, त्यांनी वसतिगृहाची संपूर्ण माहिती अतिशय छान रीतीने दिली. न्यासाची काम करण्याची चतुःसूत्री हिच त्याच्या वाढीची आणि समाजाकडून स्वागताची व सहभागाची पायाभरणी आहे, हि चतुःसूत्री समजावून घेतानाच लक्षात आले कि न्यासाने दुर्गम भागातील मुलांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य समोर ठेवले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपवून परतत असलेल्या मुलांमधील तिथे वावरताना दिसत असलेला आत्मविश्वास हेच सर्व काही सांगून जातो.
दूर दूर असलेल्या अनेक गावातील मुलांकडे बघून त्यांना अत्यंत आवश्यक असलेल्या शिक्षणाची गरज समजावून घेताना न्यासाने वसतीगृहाचा विस्तार करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे आणि येत्या १७ जानेवारी २०१७ रोजी नवीन १५० मुलांच्या निवासाची सोय होईल अश्या इमारतीचे भूमी पूजन करण्यात येईल.

न्यासाची काम करण्याची चतुःसूत्री:
शिक्षण - दुर्गम
भागातील मुलामुलींना शिक्षणाचे कवाडं उघडे करणे आणि समाजामध्ये त्यांच्या मार्फत
जागृती करणे.
आरोग्य - वसतिगृहातील मुलांचे आरोग्य तसेच निरोगी समाजनिर्माणासाठी वनवासी कल्याण आश्रम च्या माध्यमातून गावोगावी आरोग्य रक्षकांची प्रशिक्षणासह नियुक्ती करणे.
ग्राम विकास - वेल्हे या गावाच्या सहभागाशिवाय न्यासाची वाढ आणि गावाची प्रगती शक्य नाही हे लक्षात घेऊन गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम, उपाययोजना, प्रशिक्षण, रोजगार संधी व प्रशिक्षण यांचे आयोजन करणे.
ग्राम संरक्षण - वेल्हे या गावाच्या नागरिकांमध्ये जागृती घडवून आणणे आणि त्यासाठी विविध कार्यक्रमांची रचना करणे. यातूनच दर वर्षी रथसप्तमी च्या मुहूर्तावर वेल्ह्यात तोरणा महोत्सव साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला आजूबाजूच्या सर्व गावातून नागरिक सहभागी होतात.

आपल्या सेवा सहभागाच्या उपक्रमाची
माहिती:
श्री. आंबेकरांकडून वसतिगृहातील मुलासाठी
येणाऱ्या थंडीला तोंड देण्यासाठी म्हणून मुलामुलींसाठी १२१ स्वेटर्स ची मागणी
करण्यात आली आणि कामाला सुरुवात झाली, आणि मग असे ठरले कि केवळ स्वेटर्स न
देता न्यासाला काही वस्तूंची आवश्यकता असल्यास ती देखील पूर्ण करूया आणि अशानेच
बघता बघता वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक मदतीच्या स्वरूपात येणाऱ्या साहाय्याची जणू
रीघच लागली.
त्यातूनच मग अश्या सर्व समाजोपयोगी कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी आणि सर्व रहिवाश्यांच्या सहभागासाठी CSR@Madhukosh (Citizens' Social Responsibility @ Madhukosh) म्हणून एक Whatsapp गृप पण बनवला आणि उत्साही रहिवाशी नागरिकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग दिला. काही काहींनी तर थेट परदेशातून मदत पाठवली आणि १३ तारखेला मधुकोष आणि परिसरातील अन्य रहिवाशी संस्थांमधील मिळून ३२ जण सहकुटुंब न्यासाच्या ठिकाणी गेलो.
वेल्ह्याचा आजूबाजूच्या गावांमधील शेतकऱ्यांशी असलेले चांगले संबंध आणि शेतकरी ते ग्राहक यांची थेट भेट घडवून आणावी म्हणून आंबेकरांशी चर्चा देखील करण्यात आली आणि सोसायटीतर्फे अश्या प्रकारे शेतकऱ्यांना थेट मदत जर कुठल्याही स्वरूपात करता आली तर ती करण्याचे देखील ठरवले.

सेवा कार्यक्रमाचे सर्व फोटो येथे देत आहे - https://plus.google.com/117783181642492979614/posts/UXjkkJCRqhZ
सर्वांच्या माहितीसाठी म्हणून खाली सामानाची यादी देत आहे -
| सामान | मात्रा |
| मिरची पावडर | ५ किलो |
| कांदा लसुन मसाला | ७ किलो |
| धणे पावडर | ५ किलो |
| गोडा मसाला | ५ किलो |
| हळद | ५ किलो |
| शेंगादाणे | २५ किलो |
| ज्वारी | २०० किलो |
| कांदे | १०० किलो |
| मटकी | ५ किलो |
| मुग | ७ किलो |
| वाटाणा | ५ किलो |
| राजमा | ५ किलो |
| जिरे | ५ किलो |
| मोहरी | ५ किलो |
| कपड्याचे साबण | २०० |
| आंघोळीचे साबण | २०० |
| गुड नाईट लिक्विड - | १० |
| फ़ुटबाँल | २ |
| बुध्दिबळ | २ |
| रिंग | २ |
| क्रिकेट चे साहित्य | १ |
| बॅडमिंटन चे साहित्य | १ |
| टेनिस चे साहित्य | १ |
| *बारावी वाणिज्य ची पुस्तक* | |
| पेन | ७० |
| तृतिय वर्ष वाणिज्य ची पुस्तक | |
| वह्या | २१५ |
| *मुलांचे स्वेटर* | ५० |
| *मुलींचे स्वेटर* | ७१ |