Monday, August 1, 2016

आंतर्राष्ट्रीय योग दिवस २०१६

आंतर्राष्ट्रीय योग दिवस, २१ जून २०१६


पल्या मधुकोष सोसायटी मध्ये योग शिक्षिका सौ. आपटे आजी यांनी साधारण १ महिना आधी मे मध्ये असा विषय केला कि एवढी मोठी सोसायटी आहे, आणि आज कालच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्व कोण जाणत नाही, तर मग योग दिन का साजरा करू नये. झाले तर मग, २१ जून च्या आसपास चा रविवार पाहून १९ जून ला सोसायटी मध्ये योग दिन घेण्याचे ठरले.
कार्यक्रमाच्या दिवशी घेण्यात येणारे विविध योगासने, सूर्यनमस्कार, योग संबंधी दिली जाणारी माहिती तसेच या सर्वांचे सोसायटी मधील सर्वांना सराव व्हावा म्हणून फेज ३ च्या मागील बाजूस दररोज सराव देखील सुरु झाला. ज्यांना रोज सकाळी येणे जमत नाही त्यांच्यासाठी खास शनिवारी व रविवारी अभ्यास वर्ग घेण्यात आले. आणि शेवटी तो रविवार उजाडला.  सकाळपासून वरुणराजाने आपली कृपादृष्टी दाखवण्यास सुरु केली व लॉन वर घेण्यात येणारा कार्यक्रम थोडा बदल करून फेज ३ च्या पार्किंग मध्ये हलविण्यात आला.
सर्व सोसायटी मध्ये अगोदरच सूचना फलकावर सूचना लावलेल्या असल्यामुळे उत्साही नागरिक कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊ लागले. दररोज योगासनांच्या सरावासाठी एकत्र येणाऱ्या महिला तर एकदम उत्साहाने सर्व तयारी करत होत्या. कार्यक्रमासाठी बनवण्यात आलेला फ्लेक्स सर्वांचे आकर्षण ठरला, त्याने कार्यक्रमाला एक छोटेखानी उठाव आला.


कार्यक्रमाची सुरुवात आपटे आजींच्या योगासने व त्याचे दैनंदिन महत्व यावरील अतिशय माहितीपूर्वक अश्या व्याख्यानाने झाली. त्यानंतर समंत्र १२ सूर्यनमस्कार घालण्यात आले. यानंतर विविध असणे शिकवण्यासाठी आजी व त्यांच्या काही शिष्या पुढे आल्या. पश्चिमोत्तानासन, सरलहस्तभुजंगासन, पवन मुक्तासन, त्रिकोणासन असे बसून, पाठीवर/पोटावर झोपून व उभे राहून करण्यात येण्यासारखे असणे सर्वांनी केली.
कार्यक्रमाची सांगता ३ ओंकारांनी करण्यात आली तसेच सोसायटी मध्ये दैनंदिन योगासनांचा वर्ग, महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र, असा सुरु करण्यात येईल अशी घोषणा करून झाली.
कार्यक्रमाला एकूण ६२ जण (३५ महिला, २० पुरुष व ७ लहान मुले) उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सर्व फोटो इथे बघायला मिळतील (सौजन्य - नेहा पटवर्धन)
You Din Photos at Madhukosh by Neha

काही निवडक फोटो येथे देत आहे -







No comments:

Post a Comment